सीधा क्लिन बोल्ड! रिंकू सिंगच्या सिक्स पॅक ऍब्सवर शुबमन गिलची बहिण फिदा, कमेंटमध्ये म्हणाली…

Rinku Singh: आयपीएल 2023 मध्ये अनेक स्टार खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला आहे. यामध्ये रिंकू सिंगच्या नावाचाही समावेश आहे. रिंकूने आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) कोलकाता नाइट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना प्रभावित करण्यात यश मिळवले. आता आयपीएल 2023 संपले असून रिंकू मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.

केकेआरचा युवा फलंदाज रिंकू सिंग आयपीएल संपल्यानंतर सुट्टीसाठी मालदीवला गेला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर मालदीवमधील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो शर्टशिवाय दिसत आहे. यात त्याचा सिक्स अॅब्स पॅकही दिसत आहे. चाहत्यांना हे फोटो खूप आवडत आहेत. रिंकूच्या सिक्स पॅक्स ऍब्सवर शुबमन गिलची बहिणदेखील क्लिन बोल्ड झाली आहे.

रिंकूच्या फोटोंवर कमेंट करताना शुभमन गिलची बहीण (Shubman Gill’s Sister) शहनील गिलने (Shahneel Gill) लिहिले की ‘ओ हिरो’. त्याचवेळी लखनऊ सुपर जायंट्सचा स्टार वेगवान गोलंदाज मोहसिन खानने लिहिले की, ‘रिंक्स’.