‘जेलात गेलो पण भाजपात गेलो नाही …थोरल्या पवार साहेबांचा मरेन पण मागे न हटणारा, मरहट्टा आज जिंकला’

Mumbai – कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना काल जामीन मंजूर झाला आहे. गेल्या वर्षी २ नोव्हेंबररोजी ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी अटक केली होती.

गेल्या ११ महिन्यांपासून ते ‘ईडी’ कोठडीत होते. यादरम्यान, त्यांनी जामीनासाठीही प्रयत्न केला होता, पण त्यांना जामीन मिळू शकला नव्हता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार काल त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना दिलासा देत जामीन मंजूर केला.(Big news! Former state home minister Anil Deshmukh granted bail).

दरम्यान, या घडामोडींवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, सत्यमेव जयते ! जेलात गेलो पण भाजपात गेलो नाही …थोरल्या पवार साहेबांचा मरेन पण मागे न हटणारा. मरहट्टा आज जिंकला … निष्ठावान देशमुख जामीन मंजूर .गद्दार पिचडाचा राजकीय अंत असं म्हणत त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.