Rupali Chakankar | १५ वर्षे खासदार म्हणून काम केल्यानंतरही कुटुंबाला प्रचारात उतरवायची गरज पडली, चाकणकरांचा टोला

Rupali Chakankar | खासदार म्हणून १५ वर्षे काम केल्यानंतर स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर आणि त्याचीही मोठ्या प्रमाणात जाहिरात केल्यानंतर प्रचारासाठी आपल्या वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला प्रचारात उतरविण्याची गरज का भासली,’ अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव न घेता केली. ‘सध्या प्रचारात संपूर्ण कुटुंब उतरले असून, घरात आणखी कोणी राहिले असेल, तर त्यांनाही प्रचारात उतरवाल,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चाकणकर यांनी सुळे यांचे नाव न घेता टीका केली. या वेळी माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे, शिवसेना महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, पुष्कर तुळजापूरकर आणि हेमंत लेले उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन