कार अपघातानंतर रिषभ पंतने पहिल्यांदा हाती घेतली बॅट, मैदानावर सराव करताना व्हिडिओ व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) डिसेंबर 2022च्या अखेरीस एका भीषण रस्ता अपघाताला (Rishabh Pant Accident) बळी पडला. त्यानंतर मुंबईत त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही झाली. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने पुन्हा सराव (Rishabh Pant Practice) सुरू केला आहे. विशेष बाब म्हणजे बुधवारी एक व्हिडिओ समोर आला जो 15 ऑगस्ट 2023 म्हणजेच एक दिवस आधीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पंत लोकल सामना खेळताना दिसत आहे ज्यामध्ये त्याची फलंदाजी पुन्हा पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तो पुढे जाऊन तेजतर्रार शॉट्स मारतानाही दिसत आहे.

पंत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडिओ नक्कीच दिलासा देईल. सोशल मीडियावर अनेक लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत. ऋषभ पंतने काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण आणि पुनर्वसन सुरू केले होते. चाहत्यांनी खूप दिवसांपासून त्याची फलंदाजी पाहिली नाही. मात्र आता ते या व्हिडिओमध्ये पंतला जुन्या रुपात फलंदाजी करताना पाहू शकतात. मात्र, सध्या पंत पुढे सरकत आपले जुने शॉट्स खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु कुठेतरी त्याचे पाय अद्याप पूर्णपणे बरे झालेले दिसत नाहीत.