Rohit Sharma | वानखेडेवर हार्दिकला ट्रोल करणाऱ्या चाहत्यांना पाहून रोहितनं काय केलं? Video जिंकेल मन

Rohit Sharma | मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर हार्दिक पांड्याबरोबर कोणत्याही गोष्टी नीट घडताना दिसत नाहीत. हंगामाच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक स्टेडियममध्ये हार्दिकचा हुर्यो उडवला जात आहे. त्याचा संघही सतत पराभवाचा सामना करत आहे. हार्दिक अहमदाबाद आणि हैदराबाद नंतर त्याच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर उतरला. तिथेही चाहत्यांनी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून हटवल्याने चाहते सर्वाधिक संतापले आहेत.

रोहितने चाहत्यांना शांत केले
वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक सुरू झाल्यापासूनच चाहते हार्दिक पांड्याला चिडवत होते. नाणेफेकीच्या वेळी संजय मांगरेकर यांनीही प्रेक्षकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षणादरम्यानही परिस्थिती बदलली नाही. हार्दिक पडद्यावर येताच चाहत्यांनी आरडाओरडा सुरू केला. अशा परिस्थितीत रोहित शर्माने प्रेक्षकांना शांत राहण्यास सांगितले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना रोहितने प्रेक्षकांना दोन्ही हातांनी शांत राहण्याचे संकेत दिले. त्यामुळे इथून पुढील सामन्यात रोहितचे चाहते हार्दिकला ट्रोल करणं थांबवतील, अशी अपेक्षा आहे.

राजस्थानने सहज हरवले
लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांच्या भेदक गोलंदाजीनंतर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला आणि रियन परागच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सलग तिसरा विजय नोंदवला. मुंबईच्या 126 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल्सने परागच्या अर्धशतकाच्या बळावर 15.3 षटकांत चार गडी गमावून 127 धावा करून विजय मिळवला (39 चेंडूंत नाबाद 54 धावा, पाच चौकार, तीन षटकार). आकाश मधवालने 20 धावांत तीन बळी घेतले मात्र मुंबईला पराभवापासून वाचवता आला नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका