Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी जळगाव येथे सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा. ठाकरे आणि पवार त्यांच्या मुला-मुलींना मुख्यमंत्री बनवण्यासाठी धडपडत आहेत, त्यातून जनतेला काहीही मिळणार नसल्याचे वक्तव्य अमित शाह यांनी केले आहे.

उद्धव ठाकरेंना मुलगा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे.जे पक्ष आपल्या पार्टीत लोकशाही नाही, परिवारवादाच्या पार्टी आहेत, त्या पार्टी देशात लोकशाही ठेवू शकतील का? त्यांना त्यांच्या मुला-मुलींना मुख्यमंत्री बनवायचं, तुमच्यासाठी काही नाही. तुमच्यासाठी फक्त मोदी आहेत, असे अमित शहा म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन