Narendra Modi | कॉंग्रेसला ओबीसी समाजाचे आरक्षण मुस्लिम समाजाला द्यायचे आहे, पंतप्रधान मोदी यांचा आरोप

Narendra Modi | विरोधकांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाने देश तुकड्या -तुकड्यात विभागला गेला असून प्रामाणिक लोकांच्या हक्कांवर गदा आणली गेली आहे. भाजपचा मार्ग तुष्टीकरणाचा नसून सर्वांच्या कल्याणाचा आहे, तर काँग्रेसची इंडी आघाडी खोलवर तुष्टीकरणात गुंतलेली आहे. काँग्रेसने जारी केलेला जाहीरनामा विशिष्ट समाजाची मतपेढी जपण्यासाठी समर्पित असून त्यावर 100 टक्के मुस्लिम लीगचा प्रभाव दिसून येतो, अशा परखड शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज कॉंग्रेसवर नवा हल्ला चढविला.

उत्तर प्रदेशातील आग्रा, आंवला आणि शाहजहानपूर येथे आयोजित केलेल्या विशाल विजय संकल्प शंखनाद महासभांमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जनतेला सपा आणि काँग्रेसच्या वारसा कर आणि एक्स-रे योजनेची माहिती दिली.

भाजपचे संकल्प पत्र देश मजबूत करण्याच्या संकल्पाशी समर्पित असून पाया जितका मजबूत तितके घर मजबूत, या विचाराने भाजप गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला शक्ती यांना “विकसित भारता”साठी सक्षम करत आहे, असे ते म्हणाले. भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण कधीच दिले जाणार नाही हे स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच स्पष्ट झाले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इच्छेनुसार संविधानाचा आणि सामाजिक न्यायाचा तो गाभा आहे. पण काँग्रेस हा असा पक्ष आहे, जो बाबासाहेबांचा, संविधानाचा आणि सामाजिक न्यायाचा अपमान करत आहे. काँग्रेसने कधी कर्नाटकात, कधी आंध्र प्रदेशात आणि कधी आपल्या जाहीरनाम्यात अनेक वेळा धर्माच्या आधारावर आरक्षणाचा पुरस्कार केला आहे. देशाच्या संविधानाने आणि देशाच्या न्यायालयांनी काँग्रेसला हे करण्यापासून वारंवार मनाई केली आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेने नेहमीच काँग्रेसची प्रत्येक गोष्ट फेटाळून लावली, त्यामुळे काँग्रेसने आता मागच्या दाराने एक खेळ खेळायला सुरुवात केली आहे, ज्यातून एससी, एसटी आणि ओबीसींच्या डोळ्य़ात धूळफेक करण्याच प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसने आता धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काँग्रेसने ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणातील काही हिस्सा हिसकावून धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची योजना आखली आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने रातोरात कागदावर शिक्का मारून राज्यातील मुस्लिम समाजाला ओबीसी बनवून 27 टक्के आरक्षणात समाविष्ट केले. काँग्रेसने ओबीसी वर्गाच्या हक्कांवर डल्ला मारला आहे. तोच खेळ यूपीमध्ये खेळण्याचा काँग्रेसचा मानस असून यावेळी त्यांना समाजवादी पक्षाचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.

2012 मध्ये, उत्तर प्रदेश विधानसभेच्या आधी, काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने असाच प्रयत्न केला होता. काँग्रेसने धर्माच्या आधारावर अल्पसंख्याकांना ओबीसी आरक्षणाचा एक भाग देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर त्यांच्या हेतूत यशस्वी झाले नाहीत. काँग्रेस आणि सपाची ही घातक खेळी उत्तर प्रदेशातील जनतेला आणि ओबीसी समाजाला समजून घ्यावी लागेल. भारतीय राज्यघटनेनुसार उत्तर प्रदेशातील अनेक ओबीसी जातींना आरक्षणाचा अधिकार आहे, पण काँग्रेस आणि सपा त्यांच्याकडून हा अधिकार हिसकावून त्यांच्या आवडत्या व्होट बँकेला द्यायचा आहे. आपल्या व्होटबँकेसाठी सपा यादव आणि मागासवर्गीयांचा सर्वात मोठा विश्वासघात करत आहे. तुष्टीकरणात बुडलेल्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या दोघांची विचारसरणी सारखीच आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेस आणि सपाच्या दोन मुलांमधील मैत्रीचा आधारही तुष्टीकरणाचे राजकारण आहे. ही दोन्ही मुलं आपल्या भाषणात ओबीसी-ओबीसी करतात, पण मागच्या दाराने ओबीसींचे हक्क हिसकावून त्यांची व्होट बँक मजबूत करण्याचे काम करतात, अशी टीका पंतप्रधानांनी केली. काँग्रेस पक्षाचे एक वैशिष्टय़ असे आहे की, जेव्हा त्यांना कोणतेही मोठे दुष्कृत्य करावे लागते, तेव्हा ते देशाच्या आणि संविधानाच्या नावाने आवाज उठवू लागतात. 70 च्या दशकात काँग्रेसने अशाच प्रकारच्या घोषणा देत देशात आणीबाणी लागू केली होती. आज पुन्हा एकदा काँग्रेसने फ्लॉप चित्रपट प्रदर्शित केला आहे, अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसची खिल्ली उडविली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन