अग्निवीरांच्या सहाय्याने लष्कराचा ताबा घेण्याचा RSS चा प्रयत्न; कुमारस्वामींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली – केंद्र सरकारने (Central Government) आणलेल्या सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेबाबत(agnipath) देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये अग्निपथ योजनेबाबत निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणी निदर्शनाच्या नावाखाली जाळपोळ, तोडफोड केली जात आहे.

दरम्यान, तरुणांना भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर करण्यात आलेली ‘अग्निपथ’ योजना लष्करावर ताबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) छुपा अजेंडा असल्याचा गंभीर आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केला आहे. लष्करात भरती झाल्यानंतर आणि सेवा संपल्यानंतरही अग्निवीर आरएसएस कार्यकर्ते असतील असंही ते म्हणाले आहेत.

कदाचित त्यांना (आरएसएस) देशात नाझी राजवट अंमलात आणायची आहे. यासाठी त्यांनी अग्निपथ योजना आणली आहे. यासंबंधी अनेक चर्चेचे मुद्दे आहेत. माझ्या मनात या योजनेसंबंधी अनेक शंका आहेत,” असं कुमारस्वामी यावेळी म्हणाले.