राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच मनसेला मोठे खिंडार; रुपाली पाटील यांचा राजीनामा

पुणे – पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thcakery) तीन दिवसांच्या दौऱ्यावर उद्या पुण्यात येत आहे. पण, त्याआधीच मनसेच्या धडाकेबाज महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

मनसेच्या रणरागिणी अशी रुपाली पाटील यांची ओळख होती. मात्र, मागील काही दिवसांत एका मुलाखतीत पक्ष सोडण्याबाबतचे संकेत दिले होते. मात्र, आज त्यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला आहे.

पुणे जिल्ह्यात महापालिका निवडणूकीच्या तयारीला मनसे लागली आहे.याच निमित्ताने महाराष्ट्र राज ठाकरेंचा दौरा सूरू आहे. उद्या त्यांचा पुण्याचा दौरा आहे.या दौऱ्याच्या आदल्या रात्रीच रूपाली पाटील यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहअनिल शिदोरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपुर्द केला आहे. लवकरच नवीन पक्षात त्या जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीये.

मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत.यापुढेही आपले आशीर्वाद व मा. श्री.राज ठाकरे हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल, असे राजीनामा पत्रात रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.