या तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता

किसान सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार ही चर्चा पारा पारावार रंगली आहे. आधीपासून मार्च आणि डिसेंबरमध्ये हप्ते येतात हे सर्वाना माहीत, त्यामुळे 15 डिसेंबरला दहावा हप्ता जमा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण एमटीओ जनरेट न झाल्यामुळे त्यामुळे हप्ता लांबणीवर पडला आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षा आहे 16 डिसेंबरला पीएम मोदी दहावा हप्ता रिलीज करतील. या अंदाजा मागे कारण असे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 डिसेंबरला गुजरात सरकार आयोजित नैसगीक शेती पद्धती ऑनलाइन कृषि कार्यक्रमाचा समारोप करणार आहेत. या कार्यक्रमाला 500 हजार शेतकरी उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की कार्यक्रमाच्या वेळेस मोदी दहाव्या हपत्याची घोषणा करतील.

गेल्या वर्षी 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले होते. तब्बल 18 हजार कोटी रुपये 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना देण्यात आले होते. 31 मार्च 2021 पर्यत या हपत्याअंतर्गत 10,23,49,443 रुपये खात्यात जमा करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 हजार रुपये वर्षातून तीन वेळा जमा केले जातात. आता पर्यटन तब्बल 9 हप्ते सरकारने भरले आहेत. 12 कोटीहून अधिक नागरिक नोंदणीसाठी उत्सुक आहेत.आता किसान सन्मान योजनेत अनेक नियम बदलण्यात आले आहेत. त्यसाठी केवायसी देखील अनिवार्य आहे.