पेट्रोल वरील १६.२८ रुपये व डिझेल वरील ११.१९ रुपये कमी करा अशी भाजपाची मागणी होती त्याचे काय झाले ?

मुंबई : आज कॅबिनेटच्या बैठकीत काही लोकहिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत राज्यातील पेट्रोल – डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लीटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार आहे. पेट्रोल – डिझेलचे (Petrol- Diesel) दर कमी (Rates lower) केल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई (Inflation) काही प्रमाणात कमी होणार आहे.

दरम्यान, आज घेतलेल्या या निर्णयावर कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Congress spokesperson Sachin Sawant) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, आज शिंदे फडणवीस सरकारने पेट्रोल व डिझेल दरांमध्ये अनुक्रमे ₹५ आणि ₹३ एवढीच कपात केली याचे आश्चर्य वाटते. मविआ सरकारकडे (MVA) एकूण वॅटवर ५०% कपात करा म्हणजे एकूण पेट्रोल वरील ₹३२.५५ पैकी ₹१६.२८ व डिझेल वरील ₹२२.३७ पैकी ₹११.१९ कमी करा अशी भाजपाची (BJP) मागणी होती. त्याचे काय झाले ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रीय कराएवढे राज्याचे कर असावेत व राज्याचा कर केंद्रापेक्षा ₹१० जास्त असल्याने मविआमुळे महागाई वाढत आहे असा आरोप फडणवीस जी करत होते. अजूनही केंद्रापेक्षा जास्त महाराष्ट्राचा कर आहेच. त्याचे काय ? अजूनही गुजरात (Gujrat) व कर्नाटक ( Karnataka) मधील दर फार कमी आहेत. त्याचे काय ? जवाब दो! असं सावंत यांनी म्ह्टले आहे.