‘साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल’

मुंबई – शिंदे-फडणवीसांचं सरकार (Shinde-Fadnavis government) राज्यात आल्यानंतर जेष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईतीली वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये घेतली. बहुमत चाचणीच्या पूर्वसंध्येला पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घेतलेल्या या बैठकीला महत्त्व आलं होतं. यावेळी बोलताना शिंदे-फडणवीसांचं हे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशा सूचना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्या.

ज्या आमदारांना मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा ते काही दिवसांत स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेलं सरकार पुढच्या काही महिन्यांमध्ये सहज कोसळण्याची शक्यता आहे, असं पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे (BJP leader Nilesh Rane) यांनी शरद पवार यांच्यावर शरसंधान केले आहे. ते म्हणाले, साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग? असा खोचक सवाल निलेश राणे यांनी केला आहे.