बहुमत चाचणीपूर्वी ठाकरेंना मोठा धक्का; संतोष बांगरही शिंदे गटात सामील

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. त्यानंतर चोवीस तासातच शिंदे सरकारने शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का दिला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान करणारे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आमदार संतोष बांगर हेही शिंदे गटात सामील झाले आहेत.

संतोष बांगर हे कालपर्यंत शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान दिले होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत संतोष बांगर दिसल्याचे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. थेट मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांसोबत आज विधानभवनामध्ये विजयी झाल्याच्या संकेत दर्शवत बांगर यांनी प्रवेश केला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीच शिवसेनाला हा धक्का बसलाय.