…नाहीतर चंद्रकांत पाटील तुम्ही सुद्धा उघडे पडाल; राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

मुंबई : पवई पेरूबा पास्कोली या १३८ एकराच्या जागेवर पुनर्वसनाच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अमित शहा, तसेच काही केंद्रीय मंत्र्यांच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी लोकांना धमक्या देऊन वसुली केली आहे. तसेच त्याची जवळपास माझ्याकडे लोकांनी प्रत्यक्ष समोर येऊन किरीट सोमय्यांच्या विरोधात २११ प्रकरणे दिली आहेत. त्यामुळे तुम्ही त्याच्या बाजूने उभं राहु नका नाही तर तुम्ही सुद्धा एक दिवस उघडे पडाल. असा इशारा संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, आता किरीट सोमय्याच स्वतः ची चप्पल स्वतः च्या तोंडावर मारणार आहेत. तसेच त्यांची भविष्यात लोक देखील धिंड काढणार आहेत. चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हणाताना ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या बाजूने उगाच बेगाने शादी मैं जी नेतेमंडळी नाचत आहेत. तुम्ही जरा जपून रहा. कारण त्याच्यासोबत तुमची देखील लोक धिंड काढतील.

मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या हातून असं काम होणार नाही. परंतु यांच्याच नावाखाली सोमय्यांनी त्यावेळीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्या बोगस प्रकल्पावर सही करून घेतली आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी काही कल्पना नसावी. परंतु फडणीसांच्या नावाखाली किरीट सोमय्या असले प्रकार करत होता. लोकांना धमक्या देऊन लुबाडत होता. आतापर्यंत किरीट सोमय्यांची लोकांनी समोर येऊन २११ प्रकरण दिली आहेत. रोज मी किरीट सोमय्यांची प्रकरण बाहेर काढणार आहे. या सर्व प्रकरणामधून त्यांनी मागील काही वर्षापासून जवळपास साडेसात हजार कोटी रुपये गोळा केले असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितले.

पवई येथील पुनर्वसनाच्या प्रकरणात ४३३ बोगस नावे जोडले गेले आहेत. ही लोक कुठुन आलीत, त्यांची कागदपत्रे, आणि आधार कार्ड हे सर्व माझ्या जवळ आहेत. तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी ४० लाखांपेक्षा अधिक रूपये घेतले आहे. त्यामुळे हा घोटाळ्याच्या प्रकरणात जवळपास २०० ते ३०० कोटी रूपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने त्या काळात हा सगळा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितले.