शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर आज पुन्हा ‘हे’ दोन बडे नेते भेटणार

Nagpur: दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पवार यांचे निवास स्थान ‘सिल्वर ओक’मध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्यांवर जवळपास सव्वा तास चर्चा झाली होती.

या दोन बड्या नेत्यांच्या भेटीनंतर आता आणखी २ नेते भेटणार असल्याचे समजत आहे.  नागपुरात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री नेते अनिल देशमुख (Sanjay Raut Meeting Anil Deshmukh)  यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र राज्यातील घडामोडी पाहता या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.