Mahadev Janakar | मी एक दिवस पंतप्रधान होणार आहे, महादेव जानकरांचे मोठे वक्तव्य

Mahadev Janakar | बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा बारामती मतदारसंघात जोमाने प्रचार सुरू आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Janakar) यांनी बारामतीमध्ये हजेरी लावली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

“मी परभणीतून खासदार झालो आहे आणि केंद्रात मंत्रीदेखील होणार आहे. सगळ्या विकास कामांसाठी निधी आणणार आहे. अजित पवारांनी माझा प्रचार केला आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणं माझं कर्तव्य आहे. त्यासोबतच मी एकदिवस पंतप्रधान होणार आहे”, असंही जानकर म्हणाले आहे.

“माझी परभणीची निवडणूक झाली म्हणून मी बारामतीत आलो आहे. अजितदादांनी मला तिकीट दिले तिकडे माझा प्रचार केला म्हणून मी इकडे प्रचाराला येणं हे माझं कर्तव्य आहे. बारामतीतील सगळं मला माहिती आहे. गावागावात फिरलो आहे. त्यामुळे बारामती काही माझ्यासाठी नवीन नाही. बारामतीनं मला राष्ट्रीय नेता केला”, असं महादेव जानकर म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय