Sanju Samson | संजूचे नशीब चमकणार, टी20 वर्ल्डकपनंतरही टीम इंडियात स्थान कायम राहणार!

Sanju Samson | टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बहुतांश युवा खेळाडूंना संधी देऊ शकते. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. भारत-झिम्बाब्वे मालिकेसाठी टीम इंडिया संजू सॅमसनसह (Sanju Samson) ध्रुव जुरेलला संधी देऊ शकते. संजू सध्या टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजमध्ये आहे. यानंतरही तो संघात आपले स्थान निर्माण करू शकतो.

भारताला झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. त्याचा पहिला सामना 6 जुलै रोजी होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया रियान पराग आणि अभिषेक शर्मा यांसारख्या नवीन खेळाडूंना संधी देऊ शकते. संजू सॅमसनलाही झिम्बाब्वेला पाठवले जाऊ शकते. संजूला आतापर्यंत कमी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. तो सध्या टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजमध्ये आहे. टी20 वर्ल्ड कपनंतरही संजू टीम इंडियामध्ये राहू शकतो.

सॅमसनसह ध्रुव जुरेलला टीम इंडियात जागा मिळू शकते –
संजूसोबतच ध्रुव जुरेललाही झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते. ज्युरेलने टीम इंडियासाठी 3 कसोटी सामने खेळले आहेत. पण त्याला अजून एकदिवसीय किंवा टी-20 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण आता ती शक्यता निर्माण होऊ शकते. ध्रुव जुरेलने आतापर्यंत 38 टी-20 सामन्यात 439 धावा केल्या आहेत. या काळात त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 10 लिस्ट ए सामन्यात 189 धावा केल्या आहेत.

संजूचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स कसा आहे?
सॅमसनच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर तो उत्कृष्ट राहिला आहे. त्याने आतापर्यंत एकूण 273 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत 6721 धावा केल्या आहेत. त्याने 3 शतके आणि 45 अर्धशतके केली आहेत. सॅमसनने टीम इंडियासाठी 25 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये 374 धावा केल्या आहेत. टीम इंडियासाठी सॅमसनची टी-20 सर्वोत्तम धावसंख्या 77 धावा आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप