शरद कोळींना उपनेतेपद दिल्याने संतप्त अभंगराव यांनी घेतला टोकाचा निर्णय 

Sharad Koli  : शिवसेना उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या उपनेतेपदी सोलापूर जिल्ह्यातील शरद कोळी यांची नेमणूक झाल्यामुळे पक्षात प्रचंड नाराजी वाढली आहे. पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी कोळी यांच्या नेमणुकीला तीव्र विरोध करून थेट पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अभंगराव हे शिवसेनेत ४० वर्षांपासून कार्यरत आहेत.

याआधी शरद कोळी यांच्यावर खंडणी मागणीचे गुन्हे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर कोळी यांना लगेचच पक्षाचे प्रवक्तेपद देण्यात आले. त्यानंतर नुकतेच त्यांना उपनेतेपदावर बढती मिळाली.परंतु या बढतीला सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी जोरदार विरोध दर्शवित थेट पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याची भूमिका जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर