Sharad Pawar | हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही; पवारांचा मोदींना टोला

Sharad Pawar | राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना आम्ही मर्यादा ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याबाबतीत काय बोलले? की भटकती आत्मा. माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला की, हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीने हे बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) येथील आयोजित कार्यक्रमातून केला आहे.

शरद पवार साहेब म्हणाले की, मोदींनी शिवसेनाबाबत उल्लेख केला की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली. त्यांनी राज्य केलं. मराठी माणासाचा आत्मविश्वास वाढला. त्यांचा उल्लेख करताना ही नकली बापाची संघटना? हे बोलणं काही शोभतं? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला आणि व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे पंतप्रधानांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे की त्यांना तारतम्य राहिलेलं नाही. सत्ता हातात येते त्या सत्तेचं समर्थन करणं त्यामुळे सत्ता मिळायची शक्यता नसली तर माणूस बेफान आणि अस्वस्थ कसा होतो त्याप्रकारची स्थिती झाली आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, निवडणुका येतील. त्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ. लोकांना बरोबर घेऊ. त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्याचं वचन त्यांना देऊ. त्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. सुदैवाने या देशाचे लोक मोदी सारख्यांनी प्रश्न जे काढले त्या प्रश्नांना फारसं लोक महत्त्व देत नाहीत. निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा लोकांची चर्चा होती की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल. आज काय दिसतंय? मंदिर बांधलं. आनंद आहे. उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईल. त्या ठिकाणी रामांचा सन्मान ठेवेन. पण राजकारणासाठी मी कधी त्याचा वापर करणार नाही. ते चुकीचं काम मोदींनी केलं. त्याची नोंदी अयोध्येच्या जनतेने केले. राम मंदिर असलेल्या अयोध्येत मोदींच्या उमेदवाराचं शंभर टक्के पराभव अयोध्येच्या जनतेने केला. हा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. त्यामुळे आता त्यावर फारसा विचार करायचा नाही असेही शरद पवार म्हणाले.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) साहेब म्हणाले की, मोदींचा प्रचार मी सांगण्याची गरज नाही. प्रधानमंत्रिपदावर बसलेली व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते. पंतप्रधान एका पक्षाचा नसतो, देशाचा असतो. त्यांनी सर्व जाती,धर्म, भाषा आणि प्रांताचा विचार करायचा असतो. हे त्यांनी मुद्दाम केलं. कारण विचारधारा त्याची तशीच आहे. आज या लोकांसाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी राज्यकर्त्यांना करावी लागते. मोदी म्हणाले की , यांच्या हातात सत्ता गेली तर तुमचं मंगळसूत्र काढून घेतील. यापूर्वी असं कधी घडलं आहे का? मोदींनी सर्व मर्यादा पाळल्या नाहीत. असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी शपथ घेतली, पण लोकांनी त्यांना सहमती दिली नव्हती. देशातील जनतेने त्यांना बहुमत दिले नाही. तेलगू देसम आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची त्यांनी मदत घेतली त्यामुळे त्याठिकाणी त्यांचे राज्य झालं. आजचे जे सरकार आहे ते वेगळे सरकार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी मोदी सरकार, मोदी गॅरंटी म्हणत होते. आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही आज ते मोदी सरकार राहिलेले नाही. आज तुम्ही लोकांनी तुम्ही मताच्या अधिकारावर तुम्ही सांगितलं की हे मोदी सरकार नाही. तर इंडिया सरकार आहे. आपण पुढे जायचे आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यात आपल्याला सरकार आणायचे आहे. लोकांना विश्वास द्यायचा आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप