Adv. Ujjwal Nikam | ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना भाजपाकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

Adv. Ujjwal Nikam | भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 15वी यादी जाहीर केली. भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट रद्द केले आहे. तर दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे जेष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) हे देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकिलांपैकी एक आहेत, त्यांनी दहशतवादी अजमल कसाबला फाशी, 1993 बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून खटला आणि प्रमोद महाजन हत्या प्रकरण यासारख्या हायप्रोफाईल केसेसमध्ये सरकारची बाजू मांडली आहे.

पूनम महाजन बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 2006 मध्ये वडील प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2009 मध्ये त्यांनी घाटकोपर पश्चिममधून पहिल्यांदाच खासदारकीची निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. 2014 मध्ये त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन