शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देताना आमच्याशी काहीही चर्चा केली नाही – थोरात 

मुंबई – राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या (Constitution and democracy) संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना पाठिंबा देत आहेत. असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार?  शिवसेना महाविकास आघाडीत (MVA) आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही. असं देखील त्यांनी सांगितले आहे.

शिवसेना (Shiv Sena) हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे.