Sharad Pawar | केंद्र सरकार शेतकरी विरोधी, १० वर्षांत शेतीसाठी काय केलं? शरद पवारांचा सवाल

Sharad Pawar | देशातील शेतकरी वर्ग आज अस्वस्थ आहे. मिळालेली सत्ता ही जनतेच्यासाठी वापरायची असते. सध्या देशातील शेतकरी मोठा संकटात आहे मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी शरद पवार बोलत होते.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, १० वर्षापूर्वी मी कृषी खाते सोडलं आणि मोदींचे राज्य आले. या दहा वर्षात त्यांनी शेतीसाठी काय केलं? आज देशातील शेती संकटात आलीये, अनेक प्रश्न निर्माण झालेत. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर देशभरातील शेतकऱ्यांनी शेतमालाला किंमती नीट मिळाव्यात यासाठी आंदोलन करायचं ठरवलं. याठिकाणी लोक हजारोंच्या संख्येने आले. यात केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांशी विचारविनिमय करेल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी ढुंकून बघितलं नाही. पण पंजाबचा शेतकरी हा बहाद्दर होता. ही मंडळी संपूर्ण एक वर्ष याठिकाणी होती. शेवटी सरकारला नाईलाजाने हे धोरण मान्य करावे लागले. सरकारने शब्द दिला, निर्णय घेतले पण त्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अनेक संकट वाढत आहेत. असेही शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, इंग्रजांच्या काळात सातारकर घाबरले नाहीत. मात्र,किरकोळ लोकांच्या समोर सुद्धा घाबरणार नाहीत. आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक आहोत. छत्रपतींच काय बोलायचं? कॉलर उडवायचं म्हणजे आधी सकाळ आहे का? संध्याकाळ आहे? हे बघावं लागतं. त्यांच्या विषयी जास्त बोलण्याचे कारण नाही. आम्ही गादीचा सन्मान करतो,पण मत देताना मत गादीला देत नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन