Amol Kolhe | पराभवाच्या धास्तीमुळेच अमोल कोल्हे आजारी शरद पवारांच्या सभांसाठी आग्रही ? 

Amol Kolhe | महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे शिरूर लोकसभेचे (Shirur LokSabha) उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासाठी शुक्रवारी (दि. १० रोजी) जेष्ठ नेते शरद पवार चाकणला जाहीर सभा घेणार आहेत. बारामती मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार शिरूर मतदार संघात सक्रिय झालेत.

चाकणच्या मार्केटयार्ड आवारात संध्याकाळी साडेचार वाजता शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची ही चौथी सभा आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती चिंतेचा विषय बनली आहे. असे असताना देखील अमोल कोल्हे हेच या सभेसाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.

खरतर शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यांना बोलतांना त्रास होत होता यामुळे बारामती लोकसभा मतदार संघातील शेवटची सभा देखील आवरती घ्यावी लागली होती हे सर्व ठावूक असूनही या सभांसाठी कोल्हे हे का आग्रही आहेत या प्रश्नाचे उत्तर राजकीय जाणकार चांगलेच जाणून आहेत.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून डॉ. कोल्हे सातत्याने विरोधकांवर केवळ नकारात्मक टीका करत असून विकासाच्या मुद्द्यावर बोलत नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत.  महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी एकदिलाने शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचार सुरु ठेवला आहे.यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु केला आहे. याच कृतीची धास्ती घेतलेल्या कोल्हे यांनी शरद पवार यांच्या सभेसाठी आग्रह धरला का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती