शिंदे गटाचे शिवाजी अढळराव पाटील अजित पवारांशी हात मिळवणार? शिरूर लोकसभा निवडण्याची शक्यता 

Shivaji Adhalrao Patil: शिरूर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा लढा होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाविकास आघाडीकडून शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना उमेदवारी मिळणे निश्चित आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीअमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा निर्धार केला आहे. अशातच आता कोल्हेंना तगडे आवाहन देण्यासाठी अजित पवार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांना मैदानात उतरवू शकतात. एकनाथ शिंदे गटाचे नेते शिवाजी अढळराव पाटील अजित पवार गटात सामील होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूरच्या जागेचा फैसला येत्या 24 तासात करतील. मी राष्ट्रवादीकडून की शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार हे मुख्यमंत्री लवकरच ठरवणार आहेत,” असे आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. “खासदार अमोल कोल्हे स्वत: निर्यात केलेले उमेदवार आहेत”, असा टोला त्यांनी लगावलाय. तसेच “शिरुरमधून मीच लोकसभा निवडणूक लढवणार”, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत. टीव्ही९ मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यापूर्वी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंनी 48 हजार पेक्षा जास्त मतांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी