Sidhu Moosewala परतला! दिवंगत पंजाबी गायकाच्या आईने वयाच्या ५८व्या वर्षी मुलाला दिला जन्म

Sidhu Moosewala’s mother gives birth to son : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moosewala) आईने आज सकाळी भटिंडा रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. रुग्णालयातून एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंह भटिंडाच्या जिंदाल हॉस्पिटलमध्ये नवजात बाळासोबत दिसत आहेत. त्यांच्यासोबत दोन नर्सही बसलेल्या दिसतात. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवालाच्या आईने मुलाला जन्म दिला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर वयाच्या ५८ व्या वर्षी दुसऱ्यांदा गरोदर होत्या. काही दिवसांपूर्वीच तिच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर आली होती. त्याचवेळी, आता तिने रुग्णालयात मुलाला जन्म दिल्याची बातमी समोर आली आहे. स्वतः मूसेवालाच्या वडिलांनी फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच सिद्धूचा पुनर्जन्म झाला असल्याच्या प्रतिक्रिया त्याचे चाहते देत आहेत.

यापूर्वी अशी बातमी आली होती की सिद्धू मूसवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देऊ शकते. अलीकडेच, तिने IVF च्या मदतीने तिच्या वयाच्या या टप्प्यावर गर्भधारणेचे नियोजन केले आहे. एकुलता एक चिराग सिद्धू मूसेवालाच्या मृत्यूनंतर त्याचे आई-वडील एकटे पडले होते, त्यानंतर त्याच्या पालकांनी आयव्हीएफ तंत्राच्या मदतीने घराचा वारस मिळवण्याची आशा पूर्ण केली.

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?