जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Rajesh Tope : ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करताना मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवट टीका केली.या टीकेनंतर भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनोज जरांगेंना (Manoj Jarange Patil) अटक करत एसआयची मार्फत चौकशीही मागणी केली. तसेच रोहित पवार, राजेश टोपे, शरद पवार हे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळाल्यानंतर देखील आंदोलनाला बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. यावर आता माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी कोणताही संबंध नाही. यामध्ये मी दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. ते विधानभवनात बोलत होते. शरद पवार आणि माझा जरांगेंच्या आंदोलनाशी कोणताही संबंध नाही. असली प्रवृती आमची नाही.  तिथून पाच किलोमीटरवर आमचा कारखाना आहे. तो सहकारी कारखाना आहे. त्यामुळे तिथे लोक थांबायचे. मुख्यमंत्रीही त्यांचे हेलीपॅड तिथेच उतरवत होते. मीडियातील बरेच सहाकारीही तिथेच थांबतात, असेही राजेश टोपे यावेळी बोलताना म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

माझ्यावरील सर्व आरोप धादांत खोटे- राजेश टोपे
माझ्या भागात एखादं आंदोलन सुरू असेल तर त्या भागातील लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे माणुसकी म्हणून मी पाण्याची किंवा नाष्ट्याची सोय केली होती. हे समाजबांधवाप्रती असलेलं प्रेम असतं. यातील महत्त्वाचा भाग असा की कोणत्याही मोर्चा वेळी किंवा आंदोलनावेळी आपण माणुसकी विसरायची नसते हे मला सांगायचं आहे, असं राजेश टोपी यांनी सांगितलं.

दरम्यान, जो काही संशय व्यक्त करण्यात आला आणि जे काही आरोप करण्यात आले हे धादांत खोटे आहेत. माझ्यावरील दगडफेकीचे आरोपही खोटे आहेत. माझ्यावरील आरोपांमध्ये कोणतीही सत्यता नाही. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. जरांगे यांचा कोणत्याही पक्षासोबत काही संबंध नाही, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.