त्या गाडीत मोदी जरी असते तरीही फोडली असती – दीपाली सय्यद

मुंबई : राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांना भेटायला जाण्यासाठी निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कारवर शिवसैनिकांनी दगडफेक केली तसेच प्राणघातक हल्ला (Assault) केला. यावर बोलताना शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे. ‘ती गाडी मोदींची (Narendra Modi) जरी असती तरी गाडीवर चप्पल आणि दगड पडल्याच असत्या कारण शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिकवण आहे, अशा शब्दात शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या हल्ल्याचं समर्थन (Support the attack) केलं आहे.

शिवसैनिक संतापून रस्तावर उतरला होता, हे माहिती असताना सोमय्या तिकडे गेलेच का ?. बाळासाहेबांची शिकवण आहे जो नडला त्याला फोडला. जर त्या कारमध्ये मोदी असते तरीही ती कार शिवसैनिकांनी फोडली असती, असे गंभीर वक्तव्य दिपाली सय्यद यांनी केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी राणा दामत्पत्यावरदेखील जोरदार टीका केली आहे.

न्यायालयीन कोठडीत (In judicial custody) कोणाला फाईव्ह स्टार हॉटेलची ट्रिटमेंट मिळत नाही, तुमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हाला कोठडीत नेल्यावर तुम्ही म्हणत असाल की मला फाईव्ह स्टारची थाळी द्या, असे होणार नाही. कोठडीत सर्वांना समान वागणूक दिली जाते. असे म्हणत सय्यद यांनी राणा दाम्पत्याला जोरदार टोला लगावला आहे.

राज्यात जरासे काही झाले की किरीट सोमय्या दिल्लीत जातात, जरा काही झाले की मोदींशी चर्चा करणार केंद्राशी चर्चा करणार म्हणतात, ते केवळ केंद्रीय यंत्रणामध्ये गुरफटलेले आहेत. सोमय्यांना लोकशाही माहितच नाही का ? असा सवाल यावेळी दिपाली सय्यद यांनी केला आहे.