पाकिस्तान जिंकेल वनडे विश्वचषक, शोएब अख्तरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, भारत…

ODI World Cup 2023: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने 2023 मध्ये भारतात आयोजित करण्यात येणारा एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) गेल्या 50-60 वर्षांतील सर्वोत्तम स्पर्धा असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या अख्तरने या वर्षी विश्वचषकाचे विजेतेपद जिंकण्यासाठी 3 प्रबळ दावेदार कोण आहेत? हे देखील सांगितले.

शोएब अख्तर म्हणाला की, भारतासोबतच इंग्लंड आणि पाकिस्तान हे आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे विजेतेपद जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत.

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना होणार आहे. मग पाकिस्तान अंडरडॉग होईल. जेव्हा दोन्ही संघ मैदानात आमनेसामने असतील तेव्हा विश्वचषकाबद्दल कोणीही बोलणार नाही. हा सामना पूर्णपणे भारत विरुद्ध पाकिस्तान असा असेल. गेल्या 50-60 वर्षांतील हा सर्वोत्तम विश्वचषक असेल, असा माझा विश्वास आहे, असे अख्तर म्हणाला.

शोएब अख्तरने स्टार स्पोर्ट्स शो ‘फ्रेनेमीज’मध्ये सांगितले की, पाकिस्तानला विजेतेपदासाठी आपल्या गोलंदाजीचा योग्य वापर करावा लागेल. तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह पाकिस्तानने स्पर्धेत उतरावे, असा सल्लाही त्याने दिला.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde