रिपब्लिकन पक्षाचे येत्या 10 मे रोजी ‘या’ मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन

पुणे – मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत अल्टीमेटम देऊन त्यानंतर माशिदीं वरील भोंगे जबरदस्ती काढण्याचा ईशारा राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी दिल्यानन्तर दादागिरी करणे काय राज ठाकरेंनाच जमते का  असा सवाल करीत त्यांच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या भूमिकेचा आपण तात्विक विरोध केला आहे मात्र आता रिपब्लिकन पक्षाच्या ( Republican side )कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या चुकीच्या भूमिकेचा कृतीशील विरोध करावा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale )  यांनी केले आहे.

जेथे मशिदींवरील भोंगे जबरदस्ती काढले जात असतील तिथे मुस्लिम बांधवांच्या पाठीशी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी उभे रहावे जिथे हिंदू बंधवांवर अन्याय होईल तिथे हिंदू बांधवांच्या संरक्षणासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे सांगत देशात हिंदू मुस्लिम सह सर्व धर्मियांमध्ये सौहार्द बंधुत्व टिकविण्यासाठी राज ठाकरे सारख्यांच्या फुटीर भडकावू आणि भेदभाव जनक समाजात दुही पाडणाऱ्या भूमिकेचा रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी कृतिशील विरोध करावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

राज्य सरकार मध्ये मागासवर्गीयां चे नोकरी मधील अनुशेष भरून काढावा,भूमिहीनांना प्रत्येकी 5 एकर जमीन द्यावी,2019 पर्यंत च्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता द्यावी,प्रमोशन मध्ये एस सी एस टी वर्गाला रिझर्वेशन देण्यात यावे; मराठा समाजाला आरक्षण द्यावे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे या सह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या दि.10 मे रोजी राज्यभर सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शने, मोर्चे  आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय आज रिपाइं च्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

रिपब्लिकन पक्षाची सभासद नोंदणी ( Republican Party Member Registration ) मोहीम पूर्ण करून येत्या दि.15 जून पर्यंत सभासद शुल्क पक्षाच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयात  जमा करण्यात यावे असा अंतीम आदेश रामदास आठवले यांनी आज जाहीर केला.