World Cup संघात स्थान न मिळाल्याने चहलने घेतला मोठा निर्णय, भारताबाहेरील संघातून खेळणार

Yuzvendra Chahal Join New Team: भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी (World Cup 2023) 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता त्याने काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. चहल काउंटी संघ केंटकडून खेळू शकतो. चहलचे हे काउंटी क्रिकेटमधील पदार्पण असू शकते. मंगळवारी (5 सप्टेंबर) मुख्य निवडकर्ता आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, वर्ल्ड कपमध्ये निवड न झाल्याने चहलने काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला BCCI कडून NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. एका सूत्राने सांगितले की, “केंट काउंटी क्लब क्रिकेट लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेल. चहल त्यांच्यासाठी तीन-चार दिवसीय सामने खेळणार आहे. बीसीसीआयने त्याला एनओसी दिली आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला त्याची गरज असते तेव्हा तो लगेचच भारतीय संघात सामील होईल.”

चहलला आता संघात फार कमी संधी दिल्या जात आहेत. सध्या खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकासाठीही चहलला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर त्याला विश्वचषक संघापासूनही दूर ठेवण्यात आले. 2023 मध्ये आतापर्यंत चहलने केवळ 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या आहेत. त्याला प्रामुख्याने एकदिवसीय संघापासून दूर ठेवण्यात आले आहे.

चहल भारताकडून पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळतो. त्याने आतापर्यंत 72 एकदिवसीय आणि 80 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 27.13 च्या सरासरीने 121 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय चहलने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 25.09 च्या सरासरीने 96 विकेट्स घेतल्या आहेत. जून 2016 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde