चंडीगड – खलिस्तान समर्थक दहशतवादी(Teriorist) संघटनेच्या शिख फॉर जस्टिसने हरियाणा सरकारला खुले आव्हान दिले आहे. शिख फॉर जस्टिसशी संबंधित गुरपतवंत सिंग पन्नूने(Gurapatvant Singh Pannu)दावा केला आहे की, २९ एप्रिल रोजी अंबाला ते गुरुग्रामपर्यंत हरियाणाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या डीसी कार्यालयात खलिस्तानचा ध्वज लावला जाईल.
शिख फॉर जस्टिसचे गुरपतवंत सिंग पन्नू म्हणाला की, खलिस्तान सार्वमताच्या वेळी हरियाणा खलिस्तानचा भाग म्हणून दाखवला जाईल आणि म्हणूनच ही मोहीम 29 एप्रिलला चालवली जाईल. पन्नूने हरियाणा सरकारला (Hariyana Gov) धमकी देणारा व्हिडिओही जारी केला आहे. गुरुग्राम पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवून तपास सुरू केला आहे.
गुरपतवंत सिंग पन्नूने अनेकदा धमकीचे व्हिडिओ जारी केले आहेत. तो सोशल मीडियावर खलिस्तानच्या समर्थनार्थ प्रचार करत आहे. व्हिडिओ जारी करून गुरपतवंत सिंग पन्नू यांनी २९ एप्रिल रोजी हरियाणा बनेगा खलिस्तान मोहीम सुरू करण्याबाबत बोलले आहे. गुरपतवंत सिंग पन्नू हा विदेशात बसून रोज व्हिडिओद्वारे धमक्या देत असतो. सध्या सुरक्षा यंत्रणाही त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याचे षडयंत्रही करत असतो.