साहेब पक्षातून बाहेर गेलेल्यांकरिता कायमच दरवाजे बंद करा; जितेंद्र आव्हाड यांची शरद पवारांना विनंती

Jitendra Awhad Request To Sharad Pawar-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार  यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला आज पासून शुभारंभ झाला. या शिबिराच्या दुसऱ्या सत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव तथा आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख पंडित कांबळे यांच्यासह इतर वक्त्यांचे मार्गदर्शन केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष हेमंत टकले, खासदार फौजिया खान, आमदार अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अशोक पवार, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड, आमदार संदीप क्षीरसागर, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे व यांसह इतर प्रमुख मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील दुसऱ्या सत्रामध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड मार्गदर्शन करताना म्हणाले की, अजितदादांनी २०१९ मध्ये जे बंड केलं त्यामागे सर्वात मोठा हात होता तो सुनील तटकरेंचा, त्यांनीच पवार कुटुंब फोडलं, आता त्यांच्या घरातही तेच सुरू आहे. शरद पवार साहेबांच्या वयावर दिलीप वळसे पाटील तुम्ही बोलता, आता तुम्ही काय आंबेगाव ते व्हीटी मॅरेथॉन धावता की काय? असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राम मंदिराबाबत आता राजकारण होताना दिसत आहे. रामाचे सगळ्यात जास्त जवळचे नाते हे शबरीचे होते. राम मंदिर उद्घाटनाला काही नेते स्वतः पुढे पुढे जातात, परंतु राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तो मान दिला जात नाही, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. राम भेदभाव न मानणारा होता आणि तुम्ही प्रत्येक उद्घाटनाला राष्ट्रपतींना राजभवनामध्ये बंद करून ठेवता. स्वतः उद्घाटन करायला निघून जाता. तोंडात राम आणि मनामध्ये रावण असे आम्ही कधी करत नाही. राम हा तुमच्या बापाचा नाही आणि आमच्याही बापाचा नाही. राम दर्शनाला जाणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की,  १४ वर्षांचा वनवास फक्त आई-वडिलांच्या इच्छेखातर भोगणारा राम या तिन्ही पक्षांमध्ये असू शकतो का? असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अचानक गेल्या सहा महिन्यांपासून सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या की, राम नामाच्या घोषणा होतात आणि दुसरीकडे सामाजिक अस्वस्थता निर्माण होते.  २०१४ च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार साहेब यांच्या बारामतीमधील घरासमोर धनगर समाजाचे आंदोलन झाले. तेव्हा भाजपचे नेते म्हणाले होते की, आठवड्याभरात आरक्षण मिळेल. पण अजूनही धनगर समाज आरक्षणासाठी लढत आहे. दुसरीकडे ओबीसींना न्याय देण्याचे काम महाराष्ट्रात आंबेडकरांनंतर कोणी केले असेल तर ते फक्त शरद पवार साहेबानी केले, आरक्षण आणि सामाजिक प्रश्नावर बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी ही भूमिका व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, २०१९ मध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांना पुन्हा सोबत घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवणं ही चुकीच आहे. जिथे संधी मिळाली तिथे शरद पवार साहेबाच्या माणसांचा त्यांनी अपमान केला. दत्ता मेघे हे त्यापैकी एक उदाहरण आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरद पवार साहेब यांचे परतीचे दरवाजे बंद करा. ते तुमच्यावर बोलले तर एका मिनिटात त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं जाईल असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गांधीजींची हत्या झाल्यानंतर आरएसएसवर बंदी घालण्यात आली आणि त्या बंदी वर गोळवरकरांनी पत्र लिहिलं की, आमचा काय संबंध ? त्याला जे वल्लभभाई पटेल यांनी उत्तर दिले ते उत्तर इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, भविष्यात तो वाचला जाईल त्यांनी शब्दात लिहिलं की तुम्ही गांधीजींचा खून केला नाही हे आम्हाला मान्य आहे, पण गेल्या स्थापनेपासून भारतामध्ये तुम्ही जे वातावरण तयार केले त्यातूनच गांधीजींची हत्या झाली त्यामुळे त्यांच्या एवढेच तुम्ही जबाबदार आहात आणि म्हणूनच तुमच्यावर बंदी घालण्यात आली हे वल्लभभाई पटेल यांचे वाक्य होते त्यामुळे वल्लभ भाई पटेल हे आरएसएसचे होते का ? त्याचे होते का ? याचे होते का ? हा त्यावेळीचा पत्र व्यवहार स्पष्टपणे सांगतो. गांधीजी, नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांचे संबंध अत्यंत जवळचे होते, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात