आपल्याकडे ब्रँड आहे फक्त आपल्याला त्या ब्रँडचा वापर करायचा आहे – फौजिया खान

Fauzia Khan- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला आज पासून शुभारंभ झाला. या शिबिराच्या दुसऱ्या सत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव तथा आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख पंडित कांबळे (Pandit Kamble) यांच्यासह इतर वक्त्यांचे मार्गदर्शन केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष हेमंत टकले, खासदार फौजिया खान, आमदार अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अशोक पवार, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड, आमदार संदीप क्षीरसागर, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे व यांसह इतर प्रमुख मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील दुसऱ्या सत्रामध्ये बोलताना फौजिया खान यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, कलर ब्लाइंड नेस हा आजार सरकारला झाला तर काय होईल ? सरकारला एकच किंवा दोनच रंग दिसू लागले तर समाजामध्ये न्याय कुठे राहणार आहे. न्यायच नसेल तर तो समाजच कुठे राहणार आहे. समाजामध्ये न्यायाची कुठे ना कुठेतरी कमतरता आहे. आपल्याकडे सर्वात मोठा प्रश्न हा बेरोजगारीचा आहे. परंतु शासनाने आपल्यावर एक प्रकारचे असे रंग दाखवले आहेत की सर्व सुरळीत चालू आहे परंतु आपण त्यात न फसता आपल्या न्याय हक्कांसाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरून लढायला पाहिजेत असे फौजिया खान यांनी म्हटले आहे.

फौजिया खान म्हणाल्या की, आपल्याकडे ब्रँड शोधण्याची गरज नाही आहे आपल्याकडे ब्रँड आहे फक्त आपल्याला त्या ब्रँडचा वापर करायचा आहे. फिरत राहायचे आहे. कारण २०२४ हे इलेक्शनचा काळ आहे. आपल्याकडे राज्य आणि केंद्र सरकार संदर्भात अनेक मुद्दे आपल्याकडे आहेत. पण आपण ते बोलत नाही जर आपण ते बोलायला सुरू केलं तर खरोखर याचा प्रभाव येणाऱ्या इलेक्शन मध्ये नक्कीच पडू शकेल असा विश्वास फौजिया खान यांनी व्यक्त केला आहे.

राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागातील ५९ जातींना एकत्रित करा- पंडित कांबळे

राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागातील ५९ जातींना एकत्रित करून राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जाळे निर्माण करण्याचे काम करायला पाहिजे. राज्यात मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचार आणि त्यांचे प्रश्न याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख पंडित कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराच्या दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना म्हटले आहे.

पंडित कांबळे म्हणाले की, या ठिकाणी सर्व जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की, आपल्या विभागामध्ये असणाऱ्या सामाजिक न्याय विभागातील ५९ जातींना एकत्रित गोळा करण्याचे काम आगामी काळामध्ये आपल्याला करायला पाहिजे. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत त्याची सुरुवात आम्ही सातारा येथे केलेली आहे. दोन हजार मातंग समाज बांधवांच्या उपस्थितीत झालेली मातंग परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या सर्व ५९ जातींच्या परिषदा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्याचा सामाजिक न्याय विभागाचे मानस आहे.

पंडित कांबळे म्हणाले की, महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर जे काही अन्याय व अत्याचार चालू आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून तुम्ही त्यांचे वकील बना, त्यांचे प्रवक्ते व्हा व त्यांचे आशीर्वाद घ्या. सामाजिक न्याय विभागाची संघटना बांधणी करत असताना अत्यंत बळकटीने हा विषय आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा या देशाचे मालक नाहीत. संघाचे व भाजपाचे लोक तुमच्याकडे येतील व तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतील, त्याला बळी पडण्याचे कारण नाही असे पंडित कांबळे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात