Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या काही वर्षांत क्षेत्रीय दल काँग्रेसच्या जवळ येतील आणि त्यातील काही पक्षात विलिनदेखील होतील. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, “येत्या २ वर्षांमध्ये प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा त्यांच्याशी जवळीक करतील. काँग्रेस आणि त्यांच्या विचारधारेत तसा फारसा फरक नाही. आमच्या दोघांचीही विचारधारा ही गांधी-नेहरू यांच्या वाटचालीवर आहे.”

“उद्धव ठाकरे यांची विचारसरणी देखील आमच्या विचारसरणी सारखी आहे. ते देखील समविचारी पक्षासोबत काम करण्यासाठी सकारात्मक आहेत”, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.

“याबाबत पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेससोबत आहोत. पुढील काळातील निर्णय किंवा रणनीती सामुहिकपणे विचार करून घेतले जातील. आम्हाला नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणं आणि पचवणे कठीण आहे ” असंही शरद पवारांनी शेवटी म्हटलंय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर

Devendra Fadnavis | आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल

Shirur LokSabha | कोल्हे कवडीचं काम करत नसेल तर जनता त्यांना कवडीमोल करेल, दरेकरांनी साधला निशाणा