… म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थानाकडून उपमुख्यमंत्र्यांचे मानण्यात आले आभार

मुंबई – पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या(Vitthal Rukmini temple)विकास अराखड्यासाठी अर्थसंकल्पात ७३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांची भेट घेऊन अभिनंदन केले तसेच आभार मानले.

श्री विठ्ठल – रुक्मिणी देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीसुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या समाधी वर्षानिमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्ती महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील सासवड येथील संत सोपानकाका महाराजांचे समाधीस्थळ, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई यांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची घोषणा केली आहे, त्याबद्दलही देवस्थान समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करुन आभार मानले.

यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (gahininath maharaj osekar), विठ्ठल मंदिर रुक्मिणी समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव (Gajanan Gurav), व्यवस्थापक बालाजी पुलवड, शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ॲड माधवी निगडे आदी मान्यवर उपस्थित होते.