भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक २०२३मध्ये ‘हा’ गोलंदाज टीम इंडियासाठी असेल महत्वाचा

ODI World Cup: भारतात 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सुरू होणार आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व संघांना आता तयारीसाठी 100 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर या स्पर्धेत फिरकी गोलंदाजांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. अशा परिस्थितीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) दृष्टीने युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा गोलंदाज टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

भारतीय संघात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. याशिवाय युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्याशिवाय लेगस्पिनरसाठी रवी बिश्नोईचा पर्यायही संघाकडे आहे. या सर्व गोलंदाजांनी आयपीएल सामन्यांदरम्यान आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.

सौरव गांगुली स्टार स्पोर्ट्स शोमध्ये म्हणाला ,मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बीसीसीआयला त्याची कामगिरी पाहावी लागेल कारण घरच्या परिस्थितीत तो वनडे वर्ल्ड कपमध्ये संघासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो.

आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर संघाला ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीच्या मैदानावर सामना खेळायचा आहे. टीम इंडिया 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेतील सर्वात मोठा सामना खेळणार आहे. एकदिवसीय विश्वचषकादरम्यान भारतीय संघ आपले सर्व सामने 9 वेगवेगळ्या मैदानांवर खेळणार आहे.