Arjun Kapoor | दिलदार मनाचा अर्जुन कपूर! वडील नसलेल्या १० वर्षीय मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणार अभिनेता

Arjun Kapoor Gave Fund To Kid |  सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. कुठेतरी कोणीतरी आपल्या वृद्ध आई-वडिलांचा आधार बनतो. तर कुठेतरी आपले आयुष्य चालवण्याची धडपड सुरू असते. नुकताच एका 10 वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो मुलगा वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणीच्या शिक्षणासाठी रोल विकतोय.

जसप्रीत असे मुलाचे नाव आहे. एका फूड व्लॉगरने त्याच्या इंस्टाग्रामवर त्या मुलाची प्रेरणादायी कथा शेअर केली आणि काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. आता सर्वजण त्या मुलाचे कौतुक करण्यात व्यस्त आहेत. मात्र याच दरम्यान अर्जुन कपूर (Arjun Kapoor) त्या मुलाच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

अर्जुन कपूर 10 वर्षाच्या मुलाच्या मदतीसाठी पुढे आला
होय, अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टा हँडलवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने आपण त्या मुलाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अर्जुनला मुलाचा आणि बहिणीच्या शिक्षणाचा सर्व खर्च स्वतः उचलायचा आहे.

अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे – चेहऱ्यावर स्मितहास्य करून तो पुढच्या आयुष्याचा आणि त्यासोबत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सामना करत आहे. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 10 दिवसांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे आणि वडिलांचे काम हाती घेण्याचे धाडस दाखविणाऱ्या या 10 वर्षांच्या मुलाला मी सलाम करतो. मला त्याच्या किंवा त्याच्या बहिणीच्या शिक्षणात हातभार लावायचा आहे. कोणाला त्याचा पत्ता माहित असल्यास कृपया मला कळवा.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर

Devendra Fadnavis | आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल

Shirur LokSabha | कोल्हे कवडीचं काम करत नसेल तर जनता त्यांना कवडीमोल करेल, दरेकरांनी साधला निशाणा