जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे; पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात  

Rahul Narvekar – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Shivsena & NCP) आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांच्या सुनावणीचं वेळापत्रक सादर करायला सर्वोच्च न्यायालयानं आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आणखी एक संधी दिली.

याप्रकरणी आता ३० ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे.पुढच्या सुनावणीपूर्वी नार्वेकर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करू असं आश्वासन सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिलं.विधानसभा अध्यक्ष प्रसारमाध्यमांना देत असलेल्या मुलाखतींवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली.

याऐवजी त्यांनी नेमून दिलेलं काम करावं,असं ते म्हणाले.विधानसभेच्या कामकाजात न्यायालयात अजिबात दखल देत नाही.मात्र आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी त्यांना लवाद म्हणून करायची असल्यानं त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा अंकुश असेल,असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं.

यावर आता काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “विधीमंडळाचे अध्यक्ष एका पक्षानं निवडून दिलेले आमदार आहेत. पक्षाच्या हिताचे ते निर्णय घेणार. भाजपाच्या विरोधात ते निर्णय देऊ शकतील, असं वाटत नाही. जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. न्यायाधीशांच्या भूमिकेतून निर्णय घेणार आहात का नाही?” असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी राहुल नार्वेकरांना विचारला आहे.“हा सगळा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. २० जून २०२२ ला शिवसेनेच्या काही आमदारांनी पक्षांतर केलं. हे पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन आहे. पण, १६ महिन्यानंतरही अपात्रतेचा निर्णय घेऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालय आणि विधीमंडळातील वादामुळे निर्णय होत नाही,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.

https://youtu.be/GNzisd4JIH4?si=gWjIzhUX0NFwy5O_

महत्वाच्या बातम्या-

‘हमासवर इजरायलचा बॉम्ब पडताच सर्वाधिक वेदना कॉंग्रेसवाल्यांनाच होत आहेत’

‘बॉईज ४’ मधील ‘ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र

2024 साली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार