शिरूर लोकसभा मतदारसंघात अजितदादांचा बोलबाला; बहुतांश आमदार अजित पवारांच्या सोबत

पुणे – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे. (NCP split) राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister.)

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले. आमदार दिलीप वळसे पाटील,आमदार दिलीप मोहिते पाटील,अशोक पवार,अतुल बेनके या आमदारांचा अजित पवार यांना पाठींबा आहे.चेतन तुपे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, या शपथविधीला उपस्थित असणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘नो कमेंट्स’ भूमिका घेतली.