Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Shivajirao Adhalarao Patil | गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक ऐवजी शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत डोक्यात होतं. मात्र भुजबळांनी नकार दिल्याने त्याठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांना उमेदवारी देण्यात आली असा दावा विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला आहे. त्यावर आता आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर पलटवार केलाय.

महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडूक उड्या मारून गेले असले तरीसुद्धा पहिल्या पंसतीचे उमेदवार छगन भुजबळ होते. भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात होतं. परंतु भुजबळांनी नकार दिल्याने आढळरावांनी उमेदवारी मिळाली आहे. ज्यांना 2019 मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभे राहून देत होते. त्यांच्याच वळचळनीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली. असा टोला अमोल कोल्हे यांनी आढळरावांना लगावला.

अमोल कोल्हे यांनी केलेल्या टिकेला आता आढळरावांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले आहेत. कोल्हे आणि संजय राऊत हे काही विधान करतात. त्याला काहीही अर्थ नसतो. मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत आहेत तर त्यांची उमेदवारी मुख्यमंत्री कसे जाहीर करणार असा सवाल करत कोल्हे हे आता आपला अज्ञाणपणा बालिशपणा दाखवत आहेत. संजय राऊत यांच्यासोबत राहून त्यांची त्यांना शिकवण मिळाली आहे. राऊतांसारखी त्यांनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये. असा सल्ला देखील आढळरावांनी कोल्हेंना दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ