Sunil Tatkare | राज्यातील राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत करण्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार

Sunil Tatkare | राज्यातील राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत करणे आणि महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आज बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यातील महिला जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची आणि अल्पसंख्याक सेल व प्रवक्त्यांची बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare), आणि महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत आज प्रदेश कार्यालयात पार पडली.

राज्यसरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी, उन्नतीसाठी ज्या – ज्या योजना अपेक्षित आहेत त्याचा आढावा दोन – चार दिवसात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव मागणी केली जाणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचीही बैठक झाली. प्रवक्ते हे पक्षाची भूमिका वेगवेगळ्या स्तरावर मांडत असतात. लोकसभा निवडणुक आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सखोल चर्चा झाली. त्याचबरोबर सोशल मीडियाची बैठक घेतली. त्यानंतर अल्पसंख्याक सेलच्या विभागाचीही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यांचेही मत समजून घेतले. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन अनेक वर्षे वाटचाल करत आलो त्याच विचारधारेवर वाटचाल करत असतानाच अल्पसंख्याक समाजाच्या भावना समजून घेतल्या. पुढच्या आठवड्यातही आमच्या पक्षाचे जे सेल आहेत त्यांच्याही बैठका घेणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Maharashtra Sadan In Ayodhya | अयोध्यत उभे राहणार महाराष्ट्र सदन, २.३२७ एकरचा भूखंडाला उत्तर प्रदेश सरकारची मंजूरी