Elvish Yadav याला अटक, सापांचं विष वापरल्याप्रकरणी कोर्टात केले जाणार हजर

Elvish Yadav Arrested : नोएडामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बॉसचा विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवला (Elvish Yadav) अटक करण्यात आली आहे. सापाच्या विषबाधेप्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याला रविवारी चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यानंतर त्याला अटक केली होती.

सापांशी संबंधित प्रकरण काय आहे?
8 नोव्हेंबर रोजी एका रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा वापर केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी गेल्या वर्षी यूपीच्या नोएडा पोलिसांनी यूट्यूबर एल्विश यादवविरुद्ध सेक्टर 39 मध्ये गुन्हा दाखल केला होता. तसेच पोलिसांनी राहुल, नारायण, टिटूनाथ, जयकरण आणि रविनाथ नावाच्या आरोपींना अटक केली होती. सर्वात मोठी बाब म्हणजे राहुल नावाच्या आरोपीकडून 20 मिली सापाचे विष सापडले.

ते कोब्रा विष होते
विषाचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले असता ते विष कोब्राचे असल्याचे निष्पन्न झाले. रेव्ह पार्टीमध्ये कोब्रा विषाचा वापर करण्यात आला होता.

पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली
नोएडा पोलिसांनी आज एल्विश यादवची सापाच्या विषाशी संबंधित एका प्रकरणात चौकशी केली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आता एल्विश यादवला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी पाच आरोपी आधीच कारागृहात आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?