शीतल म्हात्रे म्हणजे उडत्या पंछी आहेत, त्या उडणारच; पेडणेकरांची म्हात्रेंवर टीका

मुंबई – मुंबई येथील दहिसर विभागातील माजी नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे (Sheetal Mukesh Mahatre) यांनी आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Hindu Heart Emperor Shiv Sena chief Balasaheb Thackeray) तसेच धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) साहेब यांच्या विचारांना प्रमाण मानून हिंदुत्वाचा (Hindutva) विचार स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी शीतल मुकेश म्हात्रे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे मनापासून स्वागत करित भावी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीकरिसाठी शुभेच्छा दिल्या. असंख्य कार्यकर्त्यांसह पाठींबा देणाऱ्या शीतल म्हात्रे यांना भविष्यात आपल्या प्रभागातील लोकोपयोगी विकासकामे करावीत व त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शिंदे यांनी त्यांना दिले.

दरम्यान,  शीतल म्हात्रे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar)यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शीतल म्हात्रे म्हणजे उडत्या पंछी आहेत, त्या उडणारच, आधी मनसेत होत्या नंतर सेनेत आल्या आता कुठेही जातील, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. पण ज्यांना जायचं त्यांनी जावं शिवसेना ही फिनिक्स पक्षासारखी आहे, असा विश्वासही किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

शिवसेनेत दोन गट झालेत ते एकत्र यावेत यासाठी आज शिवसेना दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावर बोलताना किशोरी पेडणेकर यांनी सगळेच आशावादी असल्याचं म्हटलं आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेनाच मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवणार असा विश्वासही किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे