“स्त्रियांवर दबाव आणण्यात पुरुषार्थ मानणारा पुरुष ऍनिमलमध्ये दाखवण्यात आलाय…”, लेखकाच्या वक्तव्याची चर्चा

"स्त्रियांवर दबाव आणण्यात पुरुषार्थ मानणारा पुरुष ऍनिमलमध्ये दाखवण्यात आलाय...", लेखकाच्या वक्तव्याची चर्चा

Swanand Kirkire On Animal Movie: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) नुकताच रिलीज झालेला अॅनिमल (Animal The Movie) बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. मात्र, या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार आणि अतिप्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गीतकार आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित अनेक ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी चित्रपटातील महिलांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. अ‍ॅनिमल भारतीय चित्रपटसृष्टीचे भविष्य अधिक ‘धोकादायक आणि भीतीदायक’ दिशेने कसे घेऊन जात आहे याबद्दलही स्वानंद यांनी सांगितले.

स्वानंद यांनी एकापाठोपाठ एक अनेक ट्विट करत चित्रपटाबाबत आपली निराशा व्यक्त केली. ‘औरत’, ‘साहेब बीवी और गुलाम’, ‘क्वीन’ आणि ‘पिकू’ यांसारख्या अनेक जुन्या चित्रपटांचा उल्लेख करून ते म्हणाले की, अशा अनेक उत्तमोत्तम चित्रपटांनी मला महिलांचा आदर करायला शिकवले. पण आज जेव्हा मी अॅनिमल पाहिला तेव्हा मला आजच्या पिढीतील स्त्रियांची खरी कीव आली. तुमच्यासाठी एक नवीन माणूस तयार केला गेला आहे जो अधिक भीतीदायक आहे, तो तुमचा तितका आदर करत नाही आणि जो तुम्हाला झुकवणे, दबाव टाकणे आणि अभिमान बाळगणे हे त्याचे पुरुषत्व मानतो.

‘मी निराश होऊन घरी परतलो’
स्वानंद यांनी पुढे लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही आजच्या पिढीतील मुली त्या सिनेमागृहात बसून रश्मिकाला मार खाताना पाहून कौतुक करत होता, तेव्हा माझ्या मनात मी समानतेच्या प्रत्येक कल्पनेला आदरांजली वाहिली होती. मी घरी आलो आहे. हताश, निराश आणि अशक्त!’

चित्रपटाच्या एका संवादावर आपला आक्षेप व्यक्त करताना स्वानंदने आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘असा चित्रपट जो भरपूर कमाई करत आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली इतिहासाला लाजवेल. माझ्या समजुतीनुसार, हा चित्रपट भारतीय सिनेमाचे भविष्य नव्याने, वेगळ्या, भयंकर आणि धोकादायक दिशेने ठरवेल!’

महत्वाच्या बातम्या-

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार? शाह म्हणाले….

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मुंबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Previous Post
Animal पाहून आजच्या पिढीच्या स्त्रियांची मला दया आली; प्रसिद्ध लेखकाची शेलक्या शब्दांत टीका

Animal पाहून आजच्या पिढीच्या स्त्रियांची मला दया आली; प्रसिद्ध लेखकाची शेलक्या शब्दांत टीका

Next Post
दारुच्या नशेत मुंबईच्या रस्त्यावर भटकताना दिसला अभिनेता सनी देओल? Video Viral

दारुच्या नशेत मुंबईच्या रस्त्यावर भटकताना दिसला अभिनेता सनी देओल? Video Viral

Related Posts
रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान, म्हणाले...

रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान, म्हणाले…

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या ( Ranveer Allahabadia) अडचणी वाढू शकतात. इंडियाज गॉट लेटेंटमधील अलाहाबादिया याच्या अश्लील टिप्पण्यांबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
Read More
jayant patil

‘महाराष्ट्रात जिथं-जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं-तिथं दुग्धाभिषेक घालणार’

मुंबई : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ वरून…
Read More
बावनकुळे

वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गमावण्यास उद्धव ठाकरेच; चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघाती टीका

Pune – महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अठरा महिने मंत्रालयतही गेले नाहीत. त्यांच्या दिरंगाईमुळे आणि…
Read More