लांगूलचालन झाले सुरु : कर्नाटकात हिजाब बंदी उठवली, सिद्धरामय्या यांनी भाजप सरकारचा निर्णय फिरवला

hijab-ban : कर्नाटकचे काँग्रेस सरकार शाळा आणि महाविद्यालयांमधून हिजाब बंदीचा जुना आदेश मागे घेणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील हिजाबवरील बंदी मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, महिलांना काहीही परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे.

काँग्रेसपूर्वी कर्नाटकात भाजपचे सरकार होते ज्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घातली होती. भाजपच्या या आदेशानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. सिद्धरामय्या यांच्या आदेशानंतर 23 डिसेंबरपासून कर्नाटकातील हिजाब बंदीचा नियम रद्द होणार आहे. सीएम सिद्धरामय्या यांनी त्यांच्या म्हैसूर सभेत ही घोषणा केली आहे. भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, भाजप कपडे, पोशाख आणि जातीच्या नावावर लोकांना वेगळे करते. सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने ही बंदी मागे घेण्याचे संकेत दिले होते.

भाजपच्या हिजाब बंदीचा मुद्दा राज्यात इतका वाढला की तो थेट कर्नाटक उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. भाजपच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारणाचे तापमान चांगलेच तापले असून अनेक ठिकाणी आंदोलने देखील झाली होती. अनेक दिवस शाळा-महाविद्यालयांचे दरवाजे बंद होते. पण शेवटी हिजाबवरील बंदी कायम ठेवण्यात आली. आता कर्नाटकातील राजकीय वातावरण बदलले आहे. यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिजाब बंदीचा आदेश मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली