Animal पाहून आजच्या पिढीच्या स्त्रियांची मला दया आली; प्रसिद्ध लेखकाची शेलक्या शब्दांत टीका

Swanand Kirkire On Animal Movie: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) नुकताच रिलीज झालेला अॅनिमल (Animal The Movie) बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. मात्र, या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार आणि अतिप्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गीतकार आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित अनेक ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी चित्रपटातील महिलांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. अ‍ॅनिमल भारतीय चित्रपटसृष्टीचे भविष्य अधिक ‘धोकादायक आणि भीतीदायक’ दिशेने कसे घेऊन जात आहे याबद्दलही स्वानंद यांनी सांगितले.

स्वानंद यांनी एकापाठोपाठ एक अनेक ट्विट करत चित्रपटाबाबत आपली निराशा व्यक्त केली. ‘औरत’, ‘साहेब बीवी और गुलाम’, ‘क्वीन’ आणि ‘पिकू’ यांसारख्या अनेक जुन्या चित्रपटांचा उल्लेख करून ते म्हणाले की, अशा अनेक उत्तमोत्तम चित्रपटांनी मला महिलांचा आदर करायला शिकवले. पण आज जेव्हा मी अॅनिमल पाहिला तेव्हा मला आजच्या पिढीतील स्त्रियांची खरी कीव आली. तुमच्यासाठी एक नवीन माणूस तयार केला गेला आहे जो अधिक भीतीदायक आहे, तो तुमचा तितका आदर करत नाही आणि जो तुम्हाला झुकवणे, दबाव टाकणे आणि अभिमान बाळगणे हे त्याचे पुरुषत्व मानतो.

‘मी निराश होऊन घरी परतलो’
स्वानंद यांनी पुढे लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही आजच्या पिढीतील मुली त्या सिनेमागृहात बसून रश्मिकाला मार खाताना पाहून कौतुक करत होता, तेव्हा माझ्या मनात मी समानतेच्या प्रत्येक कल्पनेला आदरांजली वाहिली होती. मी घरी आलो आहे. हताश, निराश आणि अशक्त!’

चित्रपटाच्या एका संवादावर आपला आक्षेप व्यक्त करताना स्वानंदने आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘असा चित्रपट जो भरपूर कमाई करत आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली इतिहासाला लाजवेल. माझ्या समजुतीनुसार, हा चित्रपट भारतीय सिनेमाचे भविष्य नव्याने, वेगळ्या, भयंकर आणि धोकादायक दिशेने ठरवेल!’

महत्वाच्या बातम्या-

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार? शाह म्हणाले….

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मुंबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास