दारुच्या नशेत मुंबईच्या रस्त्यावर भटकताना दिसला अभिनेता सनी देओल? Video Viral

Drunk Sunny Deol Roaming On Juhu Street: मंगळवारी रात्री सनी देओल (Sunny Deol) रस्त्यावर भटकतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओबद्दल बोलले जात आहे की दारूच्या नशेत सनी देओल रस्त्यावर भटकत असून तो स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही. सनी देओल इकडे-तिकडे भटकत असल्याच्या या व्हिडिओमध्ये त्याच्याजवळ एक ऑटोरिक्षा थांबते. सनी देओल रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचे पाहून ऑटोचालक थांबतो आणि कसा तरी त्याला त्याच्या ऑटोमध्ये बसवतो. आता हा व्हिडिओ काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल (Sunny Deol Viral Video) होत आहे. या व्हिडिओमागील संपूर्ण सत्य जाणून घेऊया.

नुकतेच ‘गदर 2’चे यश साजरे करणाऱ्या सनी देओलला अशा व्हिडीओमध्ये नशेत पाहून सोशल मीडियावर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. KRK ने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, हे खूप धोकादायक आहे. येथे सनी जुहूमध्ये रस्त्यावर नशेत नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सनी देओल रस्त्याच्या मधोमध कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसत आहे. मात्र, ऑटो थांबल्यावर त्याच्या चेहऱ्यावरही एक वेगळंच हसू पाहायला मिळतं. यानंतर चालक त्याला मदत करतो आणि त्याला ऑटोमध्ये बसवतो.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. शशांक उद्रापूरकर दिग्दर्शित ‘सफर’ चित्रपटाच्या शूटिंगमधील ही दृश्ये आहेत, असे काहींनी म्हटले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की सनीने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की तो मद्यपान करत नाही.

महत्वाच्या बातम्या-

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार? शाह म्हणाले….

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मुंबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास