INDvsPAK : बाबरची विराटच्या चप्पलीशीही तुलना होऊ शकत नाही; माजी पाकिस्तानी खेळाडूचा घरचा आहेर

IND vs PAK:- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने (Danish Kaneria) विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांच्यामध्ये कोण सरस आहे? यावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी कनेरिया म्हणाला की, बाबर विराटच्या तुलनेत काहीच नाही. बाबर आझमची विराट कोहलीच्या बुटांशीही तुलना होऊ शकत नाही, असा घरचा आहेर कनेरियाने दिला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात चांगला फलंदाज कोण? यावर अनेक वाद सुरू आहेत. आता, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने दोन्ही संघांमधील टी20 विश्वचषक 2024 च्या मोठ्या सामन्यापूर्वी यावर भाष्य केले आहे. आयएएनएसशी बोलताना कनेरियाने सांगितले की त्याच्या मते कोण चांगला खेळाडू आहे?

कनेरिया म्हणाला, बाबर आझमने शतक झळकावताच दुसऱ्या दिवशी तुम्हाला विराट कोहलीशी तुलना पाहायला मिळेल. अहो, बाबर आझम तर विराट कोहलीच्या चपलीच्या बरोबरही नाही. अमेरिकेचे गोलंदाज बाबर आझमवर दडपण आणत होते, तो गोलंदाजांना खेळवू शकत नव्हता. 40 धावा करताच तो बाद झाला. त्याने मैदानावर टिकून सामना जिंकायला हवा होता. पाकिस्तानने हा सामना एकतर्फी जिंकायला हवा होता.

भारत पाकिस्तानला पराभूत करेल
कनेरियाने भारत-पाकिस्तान सामन्याचे भाकीत करताना सांगितले की, भारत त्यांना वाईट पद्धतीने पराभूत करेल. ते भारताला पराभूत करू शकत नाहीत. जेव्हा-जेव्हा पाकिस्तान विश्वचषकात येतो तेव्हा ते त्यांच्या गोलंदाजीचे कौतुक करत राहतात आणि त्यांच्या गोलंदाजीमुळेच त्यांना सामना जिंकून दिला जाईल, असे सांगतात, पण त्यामुळेच त्यांचा पहिला सामना हरला, असेही कनेरियाने नमूद केले.

महत्वाच्या बातम्या-

Naseem Khan : महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्या – नसीम खान

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली इच्छा

“अयोध्येतील भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचे…”, भाजपच्या पराभवावर ‘शक्तिमान’ची लक्षवेधी प्रतिक्रिया