T20 World Cup | रिंकू आणि केएल राहुलची निवड का झाली नाही?, अजित आगरकरने सांगितले कारण

टी-२० विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोघांनीही अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी केएल राहुल आणि रिंकू सिंग यांची निवड का केली नाही? याचा खुलासा केला.

मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषद थोड्या उशिराने सुरू झाली. माध्यमांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले. या प्रश्नांपैकी दोन महत्त्वाचे प्रश्न होते ज्यावर सर्व चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या, रिंकू सिंग आणि केएल राहुल यांची निवड का झाली नाही? या प्रश्नाचे उत्तर मुख्य निवडकर्ते (T20 World Cup) अजित आगरकर यांनी दिले.

केएल राहुलबद्दल बोलताना अजित आगरकर म्हणाले, आम्हाला मधल्या फळीत एका खेळाडूची गरज होती. केएल सलामीला फलंदाजी करत आहे. संजूने चांगली कामगिरी केली आहे आणि ऋषभ पंतही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. कोण चांगले आहे आणि कोण नाही याबद्दल नाही, परंतु पंत आणि संजूने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात अधिक वेळ घालवला आहे.

रिंकू सिंगची निवड न झाल्याबद्दल मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, रिंकू सिंगने काहीही चुकीचे केलेले नाही. रिंकूला वगळणे हा सर्वात कठीण निर्णय होता. यात त्याचा दोष नाही. हे दुर्दैवी आहे. रोहितला संघात काही रिस्ट स्पिनर्स हवे होते. अक्षर, जो अष्टपैलू फलंदाज आहे, तो उपयुक्त ठरेल असे आम्हाला वाटले. संघ निवडणे आमच्यासाठी अवघड होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ramdas Athawale | कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, रामदास आठवलेंची ग्वाही

Ravindra Dhangekar | आता जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नकोय, धंगेकर यांची मोदीं सरकरावर टीका

Devendra Fadnavis | …तुम्ही कफन चोर आहात, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल