मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची विजयी परंपरा कायम, सहाव्यांदा ‘सिराज’मधून मोठा विजय

सिराज: हिमाचल प्रदेशातील 68 मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरू आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लवकरच येणार आहेत. एक्झिट पोलनुसार भाजप राज्यात पुन्हा सरकार स्थापन करून इतिहास रचू शकतो. मंडी जिल्ह्यातील 10 विधानसभा जागांपैकी सिराज विधानसभा जागा हॉट सीट आहे. राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर याच जागेवर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री व भाजपा नेते जयराम ठाकूर यांनी मोठा विजय नोंदवला. ताज्या वृत्तांनुसार, जयराम ठाकूर यांनी सलग सहाव्यांदा त्यांच्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघ सिराजमधून 20000 हून अधिक मतांनी विजयी पताका फडकवला आहे. यासोबतच, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री या विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिले आहेत. जयराम ठाकूर यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने या जागेवरून पुन्हा एकदा चेतराम यांना उमेदवारी दिली होती.